Belagavi

काहींच्या अतिक्रमणाचा रहिवाशांना फटका; नेहरुनगरात रस्त्यावरील पाणी घरात 

Share

सरकारी रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केले असल्याने पावसाचे पाणी आमच्या घरासमोर साचून घरात पाणी शिरत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नेहरूनगरमधील रहिवाशांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

होय, असे साचलेले पाणी पाहून तुम्हाला ते तळे आहे की काय असे वाटत नसेल तर तो तुमचा भ्रम आहे. कारण बेळगावातील नेहरू नगरमधील रामदेव हॉटेलच्या मागचा हा रस्ता आहे. येथील सार्वजनिक रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे जे पाणी वाहून जायला हवे ते रस्त्यावरच साचून रहात आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रासले आहेत. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांनी  महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

जर जास्त पाऊस पडला, तर इथल्या रस्त्यावर सर्वत्र पाणी साचते. त्यामुळे लोकांना त्रास होतो. महापालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Tags: