बेंगळूर येथील लालबाग ग्लास जाऊस येथे आयोजित केलेल्या फल-पुष्प प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना कर्नाटक प्रशस्ती पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
फलोत्पादन विभाग आणि म्हैसूर हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या वतीने लालबाग ग्लास हाऊस येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांर्तगत फल-पुष्प प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री ब्रशवराज बोम्मई यांच्याहस्ते झाले. दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या कुटुंबीयांनीही या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्रीही म्हणाले, डॉ पुनीतराजकुमार यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कार वितरण समारंभासाठी एक समिती स्थापन केली जाईल, या समितीत त्यांचे कुटुंबीय देखील sahbhagi असतील. १ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरित केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
१९२२ पासून निरंतरपणे फल-पुष्प प्रदर्शन भरविण्यात येते. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात अनेक लोक भेट देतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष महत्व प्राप्त झाले असून यंदा मोठ्या प्रमाणात लोक या प्रदर्शनास भेट देत आहेत. यंदाचे हे प्रदर्शन डॉ. राजकुमार आणि डॉ. पुनीत राजकुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरविण्यात आले असून या कारणांमुळेही प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रदर्शनाचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
यावेळी चित्रपट अभिनेते डॉ. शिवराजकुमार, राघवेंद्र राजकुमार, अश्विनी पुनीत राजकुमार, फलोत्पादन मंत्री मुनिरत्न औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments