संत बसवेश्वर महाराजांनी दिलेल्या तत्वांचे पालन करत त्या तत्वांचे अनुसरून करण्याच्या दृष्टिकोनातून घरोघरी वचनज्योती कार्यक्रमांतर्गत बसव तत्वांचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. श्रावण मासानिमित्त शुक्रवारी मल्लिकार्जुन नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संत बसवेश्वर महाराजांच्या ‘काम हीच पूजा’ या तत्वाप्रमाणे प्रत्येकाला काम करणे अनिवार्य आहे. बसवेश्वर महाराजांचे ‘कायकवे कैलास’ म्हणजेच काम हीच पूजा या अर्थाचे तत्व हे जगासाठी महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन महांतेश तोरनगट्टी यांनी केले.
श्रावण मासानिमित्त बेळगावमधील संचारी गुरु बसव गटातर्फे वचनज्योती कार्यक्रमाचे आयोजन रामाप्पा शिवण्णावर यांच्या घरी करण्यात आले होते. अभिषेक होसमनी दाम्पत्याने बसवभाव पूजा केली. यानंतर बसवप्रचारकांनी सामूहिक वचन पठण केले. 
यावेळी महांतेश तोरणगट्टी यांनी बसवतत्वांविषयी अनुभव व्यक्त केले. कोरोनाच्या कठीण काळातून बाहेत पडून आता नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. बारावे शतक जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. कर्नाटकात बसव तत्वांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती झाली. जगात अनेक प्रकारच्या क्रांती घडल्या मात्र बसव तत्त्वांमुळे झालेल्या क्रांतीची तुलना इतर कोणत्याही क्रांतीशी होऊ शकत नाही, बसवेश्वर महाराजांनी भेदभावरहीत क्रांती केली. त्यांच्या या तत्वांची मशाल नेहमी चमकत राहील, असे ते म्हणले. ()
यावेळी बसवेश्वर बँकेचे संचालक सचिन शिवण्णावर, राजू पद्मन्नावर, बी पी जेवणी, श्रीशैल नंदिहळ्ळी, राजू कुंदगोळ, शंकर गुडगनट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments