बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील रक्षक माजी सैनिक संघटनेच्या वतीने देशभक्तीपर गीते गाऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
रक्षक माजी सैनिक संघटना, सांबरा यांच्या वतीने काल मंगळवारी गावात कारगिल विजय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध शाळांची मुले, शिक्षक, नागरिक आणि रक्षक माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देशभक्तीपर गीते गात गावातून फेरी काढल्यानंतर सभा घेण्यात आली.
इस्कॉनच्या वतीने स्वामी श्री जीव पंडित आणि स्वामी सुनंदन दास, लोकमान्य को ऑप क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक अजित सरंजामे, एक्सलंट कोचिंग अकादमीचे अध्यक्ष नागेश दंडपुरे, मॅक्स लाइफ इन्शुरन्स अधिकारी रवी कुमार, पवन वडगंडी, महेश वरदली, रक्षक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खवासपूर, पदाधिकारी, महिला व इतर उपस्थित होते.
यावेळी कारगिल युद्धातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामीजींनी आजच्या तरुणांना देशभक्ती आत्मसात करण्याचे सांगितले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.


Recent Comments