विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या वतीने युवक व युवतींच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकासासाठी युवा नेतृत्व विकसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या नोंदणीची प्रक्रिया बेळगावात सुरू झाली आहे.
वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व खुल्या गटात ४० वयोगटातील युवकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त परीक्षा घेण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व विवेकानंद केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘स्वराज्य ७५ स्वामी विवेकानंद आणि युवा’ या पुस्तकावर ५० गुणांची ही परीक्षा होईल. त्यानंतर एकदिवसीय व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकसन शिबिर होईल. तसेच दर रविवारी त्यांच्यासाठी स्वाध्याय वर्ग घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ५० रुपये शुल्क आहे. उपक्रमासाठी शहरातील महाविद्यालयांत संपर्क करण्यात येत आहे. महाविद्यालयांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. २० ऑगस्टपर्यंत नोंदणीची मुदत आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील युवक – युवतींनी केदार कलशेट्टी (८४११८७४७९२), सोनाली पावले (९४४९५४०४५५), आनंद अरळीकट्टी (७९७५०३९२६४), अमोल जैन (९४४९९३७८३६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राने केले आहे.
कन्याकुमारीत होणार दोन हजार युवकांचे शिबिर
युवकांच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकासासाठी महाराष्ट्र, गोवा या राज्यांसह बेळगावातील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ४० वयोगटातील युवक – युवती यांच्याकरिता युवा नेतृत्व विकसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत परीक्षा, एकदिवसीय शिबिर, स्वाध्याय आदी प्रक्रियेनंतर निवडक दोन हजार विद्यार्थ्यांचे २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत कन्याकुमारी येथे शिबिर होणार आहे. यासाठी युवक – युवतींनी नोंदणी करावी, असे आवाहन केंद्राने केले आहे.


Recent Comments