बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुकमध्ये शेताकडे जाणारा रस्ता चिखलाने माखला आहे. दलदलीमुळे शेतकऱ्यांना रस्त्यावरून ये–जा करताना अडचणी येत आहेत.
येथील रस्त्याचे काम पावसाळ्यात हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय बनले आहेत. येथे जाताना अनेक अडचणी येतात. या चिखलाला तोंड देत पावसाळी पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. येथे महिला मोठ्या प्रमाणात शेतात काम करत असल्याने महिलांना या रस्त्यावरून जाऊन शेतात काम करणे अशक्य झाले आहे.
येथील रस्त्यावर अनेक गाड्या अडकल्या आहेत. तसेच येथून एखादी गाडी गेल्यास सर्वांच्या अंगावर चिखल उडतो. दरम्यान, या चिखलात अनेक महिला घसरून पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन येथील शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत गावातील एका वृद्ध महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पावसाळा सुरू झाला आहे आणि येथील लोकांना दलदलीच्या रस्त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्ता तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी त्यांनी केली.
तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. लोकांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.


Recent Comments