महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होऊन महापुरामध्ये परिवर्तन होईल. कागवाड तालुक्यातील कृष्णा नदी तीरावरील अकरा गावातील नागरिकांना महापुराचे समस्या निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करावे असे आवाहन कारवाडचे नूडल अधिकारी तसेच चिकोडी जिल्हा कृषी संचालक एल वाय रोडगी यांनी दिला आहे.


गुरुवारी सायंकाळी कागवाड येथील शासकीय विश्राम गृहात कागवाड तालुक्यातील सर्व अधिकारी, तलाठी, पी डी ओ यांची खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अधिकार्यांना त्यांच्या कामाचे वाटप करून माहिती देण्यात आले.
कागवाड तालुक्यात सध्या असलेल्या अधिकाऱ्यापैकी अनेकांनी महापुर पाहिलेला आहे याची जाणीव आहे व त्याची जबाबदारी ही माहिती आहे याकरिता प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून यंदा महापूर आल्यास सर्व तऱ्हेने सामोरे जाऊन कोणतेही परिस्थितीत मनुष्य व जनावरांचे जीवित हानी होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे यामध्ये कामसुकारो केल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित आहे असे अधिकारी यांनी सांगितले.

कागवाड चे तहसीलदार राजेश बुरली यांनी सर्व अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
यावेळी तालुक्याचे अधिकारी इरणगौडा येगणगौडर, वीरांना वाली, एम आर मुंजे, संजीव कुमार सदलगे, प्रवीण हुनशीकट्टी सह आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


Recent Comments