Banglore

बेंगळुरातील होसकेरेहळ्ळी भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Share

बेंगळुरातील होसकेरेहळ्ळी भागात काल झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीचपाणी झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या भागाला भेट देऊन संकटग्रस्त रहिवाशांना दिलासा दिला

होय, बेंगळुरातील होसकेरेहळ्ळी भागात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरात पाणी घुसून रहिवाशांना राहणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज या भागाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दत्तात्रय नगरातील परिस्थितीची बोम्मई यांनी पाहणी केली. यावेळी रहिवाशांनी पावसामुळे त्यांची दाणादाण उडाल्याचे सांगितले.  

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, या भागात नाल्यातून वाहून येणारे पाणी एका ठिकाणी तुंबून ही परिस्थिती उदभवली आहे. काही ठिकाणी नाल्याच्या जागेत घरे बांधून अतिक्रमणं केली आहेत. परिणामी नाले अरुंद झाल्याने पाण्याचा निचरा नीट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाल्यांमधील अडथळे हटवून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाय केले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूल मंत्री आर अशोक, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

 

Tags: