Belagavi

एस. जी. बाळकुंद्री यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

Share

प्रख्यात पाटबंधारे तज्ज्ञ एस.जी.बाळकुंद्री यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटन सोहळा रविवारी श्री सिद्धरामेश्वरा शिक्षण संस्थेच्या एस. जी. बाळकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात पार पडला.

बेळगावातील एस. जी. बाळकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात रविवारी एस.जी.बाळकुंद्री यांच्या जन्मशताब्दी वर्ष उपक्रमांचे उद्घाटन दिल्ली येथील अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, उशिराने सुरु होऊन देखील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाने अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. एस. जी. बाळेकुंद्री यांचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात आदराने घेतले जाते. विश्वेश्वरय्या यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर 60 वर्षांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या बाळेकुंद्री यांनी 500 धरणे बांधून विक्रम केला. जलसिंचन क्षेत्रात त्यांनी क्रांती केली.

आज शरीररुपाने ते आपल्यात नसले तरी, आणखी १०० वर्षे झाली तरी त्यांनी केलेली कामे घट्ट टिकून राहतील असे सांगून डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी नव्या शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात एस. जी. बाळेकुंद्री संस्था स्वायत्त महाविद्यालय, तांत्रिक विद्यापीठ होवो अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी एस. जी. बाळेकुंद्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लिंगायत दर्शन’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 

Tags: