विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे पंचमसाली समाजाच्या नावाचा गैरवापर करत असून भाजपाला ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा आरोप विजापूर भाजपचे उपाध्यक्ष सुरेश बिरादार यांनी केलाय.

विजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्याविरोधात भाजप कार्यकारिणीने प्रतिक्रिया व्यक्त करत यत्नाळांवर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना सुरेश बिरादार म्हणाले, पंचमसाली समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे, हे होता काम नये. पंचमसाली समाज शिस्त, एकसंघ, शांतता समाधानाने आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. 
आमदार यत्नाळांनी यापूर्वीही अनेक भाजप नेत्यांविरोधात वक्तव्ये केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संतोषजी, प्रल्हाद जोशी, अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक नेत्यांवर त्यांनी विरोधात्मक प्रतिक्रियाच व्यक्त केली आहे. त्यांनी सातत्याने अशीच विधाने सुरु ठेवल्यास पंचमसाली समाजावर कोणीही विश्वास ठेवणार नसल्याचे ते म्हणाले.
यानंतर भीमाशंकर हदनूर बोलताना म्हणाले, यत्नाळ मंत्रिपदासाठी पंचमसाली समाजाचा गैरवापर करत आहेत, हे योग्य नाही. पंचमसाली समाजासंदर्भात त्यांना यापूर्वी काळजी का नव्हती? असा सवाल उपस्थित करत स्वतःची स्तुती करताना इतरांना दोष देणे योग्य नसल्याचे हदनूर म्हणाले.
या पत्रकार परिषदेला नेते रवी मुकर्तिहाळ, विजय जोशी आदी उपस्थित होते.


Recent Comments