Banglore

बेंगळुरू येथे मास्ती भवनाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला समारंभ कन्नड साहित्याची मुख्यमंत्र्यांनी केली स्तुती

Share

चंद्रशेखर कंबार, मास्ती वेंकटेश अय्यंगार असे साहित्यिक सुरुवातीपासून श्रेष्ठ नव्हते. परंतु त्यांचे काम, त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्य आज त्यांना एका उंचीवर घेऊन गेले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली.

बेंगळुरू येथे कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि डॉ. मास्ती वेंकटेश अय्यंगार ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात करण्यात आलेल्या मास्ती भवन निर्मितीचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मास्ती भवनात साहित्याशी निगडित सर्व उपक्रम होतील. मास्ती यांचे कार्य पुढील पिढीला नक्कीच उपयोगी ठरेल, या उद्देशाने मस्तीभवन ची निर्मिती करण्यात येत आहे. या वास्तूचा कोनशिला बसविण्याचे भाग्य मला मिळाले, हे माझे पुण्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

साहित्यात आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून विचार मांडले जात आहेत. हि एक तपश्चर्या असून या तपश्चर्येतून जे ज्ञान प्राप्त करतात ते सर्व ज्ञानविजेते आहेत, तसेच कन्नडमध्ये विलक्षण असे साहित्य असून मास्ती वेंकटेश अय्यंगार यांच्यासारख्या थोर विचारवंतांनी समाजासाठी ज्ञान दिले आहे. मास्ती यांच्या साहित्यात एकाच प्रकारचे वैशिष्ट्य नसून त्यांचे साहित्य हे विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे, असे ते म्हणाले. ()

या कार्यक्रमास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रशेखर कंबार, मंत्री एस टी सोमशेखर, ट्रस्ट अध्यक्ष माविनकेरे रंगनाथ, साहित्यिक बी आर लक्ष्मणराव आदींसह मास्ती वेंकटेश अय्यंगार कुटुंबीय, अधिकारी उपस्थित होते.

Tags: