Vijayapura

विजापूरच्या नवरसपूर उत्सवाला ५ वर्षांपासून ग्रहण

Share

 विजापूर जिल्ह्यात दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या नवरसपूर उत्सव या सांस्कृतिक उत्सवाला गेल्या 5 वर्षांपासून जणू ग्रहण लागले आहे. पूर, दुष्काळ, कोरोना सांसर्गिक रोग यासारख्या याना त्या कारणाने हा उत्सव लांबणीवर टाकण्यात येत आहे.  

: या उत्सवाची पार्श्वभूमी पाहता, आदिलशाही राजवटीने सांस्कृतिक परंपरेची दिलेली देणगी आहे. इब्राहिम दुसरा याने प्रथम नवरसपूरमध्ये संगीत महल बांधून दर गुरुवार संगीत जलसा सुरु केला होता.

1989-90मध्ये याच नवरसपूरमधील संगीत महलमध्ये नवरसपूर उत्सवाचे आयोजन केले होते. मात्र गेल्या 5 वर्षांत या उत्सवाला ग्रहण लागले आहे. यावर्षीसुद्धा हा उत्सव होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पट्टदकल, हंपी येथे अशाप्रकारचे उत्सव सुरु आहेत. मात्र नवरसपूर उत्सवावर गेल्या 5 वर्षांपासून गदा आली आहे. उत्सवासाठी दिलेले अनुदानदेखील सरकारने परत घेतले आहे. सध्या कोरोनाचा कहर कमी झाल्याने हा उत्सव सुरु करण्याचा मानस विजापूर जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण जनतेतून मात्र नवरसपूर उत्सव पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कन्नड साहित्य संमेलनातही या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

 

 

 

Tags: