Banglore

प्रा. सीएनआर राव यांना एनी एनर्जी फ्रंटियर्स अवार्ड प्रदान

Share

 प्रख्यात वैज्ञानिक भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते बुधवारी २०२० चा फ्रंटियर्स अवार्ड देऊन गौरविण्यात आले.

बेंगळुरातील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडवान्सड सायंटिफिक रिसर्चच्या सभागृहात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रा. सीएनआर राव याना प्रतिष्ठेचा २०२० चा एनी एनर्जी फ्रंटियर्स अवार्ड देऊन गौरविण्यात आले. ऊर्जा क्षेत्रात केलेल्या संशोधनाबद्दल नोबेलच्या तोडीचा मानला जाणारा हा पुरस्कार इटली सरकारतर्फे देण्यात येतो. या पुरस्काराला ऊर्जा क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असेही संबोधण्यात येते. हा पुरस्कार मिळवणारे प्रा. राव हे आशिया खंडातील एकमेव वैज्ञानिक आहेत. त्यांना हा पुरस्कार आधीच जाहीर झाला होता. मात्र कोविड महामारीमुळे त्यांना तो प्रदान करण्यात आला नव्हता. त्यामुळे आज समारंभपूर्वक प्रा. राव यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री बोम्मई यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. अश्वथनारायण, डॉ. इंदुमती राव, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडवान्सड सायंटिफिक रिसर्चचे अध्यक्ष प्रा. जी. यु. कुलकर्णी यांच्यासह विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

Tags: