विजापूर जिल्ह्याला ऐतिहासिक असे महत्व आहे. याठिकाणी सुमारे ४०० हुन अधिक ऐतिहासिक वास्तू आहेत. मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे यामधील केवळ ८० टक्के वास्तू सध्या सुस्थितीत आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जातं आणि संवर्धन करण्यासाठी विजापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिटेज वॉक ला चालना दिली आहे.

विजापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. मात्र आज बहुतेक पर्यटन स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ४०० पैकी केवळ ८० टक्के वास्तू सध्या सुस्थितीत आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिटेज वॉक ची संकल्पना अंमलात आणली असून हि ऐतिहासिक स्थळे वाचविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हि संकल्पना राबविण्यात येणार आहे. या सर्व ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि या सर्व वास्तूंचे सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने हि संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी पी सुनीलकुमार यांनी दिली आहे.
या संकल्पनेतून रोजगार, व्यापार वहिवाट करण्याचा उद्देश असून जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नारीमहलला नुकतीच भेट दिली स्थानिक गाईडकडून या निर्मितीमागील उद्देश, स्थापना आणि इतर माहितीही जाणून घेतली. सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊन यानंतर आदिलशहा काळातील संगीत महालाला भेट दिली. संगीत महल, नवरस महल, यासंदर्भात माहिती घेण्यात आली. विजापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंसह बगलकोटमधील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बागलकोट आणि विजयनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना तडे गेल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. (जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अंमलात आणलेली संकल्पना हि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी नक्कीच महत्वाची ठरेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आपली मराठीसाठी विजयकुमार सारवाड, विजापूर


Recent Comments