विजापूर एस एस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या माध्यमिक विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत यशाचे कानमंत्र दिले.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला धैर्याने सामोरे जावे, परीक्षेबद्दल कोणतीही भीती मनात बाळगू नये असे आवाहन या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, पत्रकार देवेंद्र हेळवर यांनी केले.
एसएसएलसी परीक्षा हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. पुढील महाविद्यालयीन शिक्षणाचा हा पाया आहे. मोबाईलमध्ये आपला वेळ वाया न घालवता परीक्षेवर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दहावी परीक्षेत अधिकाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील आयुष्यात सर्वोच्च यश गाठण्यासाठी हेळवर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
एसएसएलसी परीक्षित विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होते. यामुळे या परीक्षेला खूप महत्व आहे. पालक, आणि शाळा यांच्यासह आपलेही नाव उंचावायचे असल्यास वियार्थ्यांनी योग्य अभ्यास आणि धैर्याने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन बी एल डी इ संस्थेचे अध्यक्ष आणि बबलेश्वर मतदार संघाचे आमदार एम बी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला विरक्तमठाचे श्री अभिनव मुरुगेन्द्रस्वामीहि उपस्थित होते. मुरुगेन्द्र स्वामींनीही विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अधिक गुण घेऊन यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. याचप्रमाणे या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास करून पुढील वाटचाल करावी, असेही स्वामीजी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रो. आय एस काळप्पनवर हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मनुष्याला संस्कार आणि नीतिमूल्यांची आवश्यकता आहे, लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळाले तर पुढील भविष्य उज्वल होते असे ते म्हणाले.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिक्षिका श्रीमती एस एस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी हाजी कबाडे, नंदिनी कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य आर वाय तोरवी यांनी स्वागत केले, शिक्षक एम एच जंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर शारीरिक शिक्षक कांतु वडेयर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.


Recent Comments