राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा नाहीय. याबाबत वरिष्ठांनीही काही सूचना दिलेली नाही. आमचा पक्ष सोडून कोणी जाणार नाही उलट अन्य पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी रीघ लागेल असे सांगत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज नवा राजकीय बॉम्ब फोडला.

विरोधी पक्षांकडून मुदतपूर्व निवडणूक घेतली जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा प्रसारमाध्यमांत आहे, पण आमच्या पक्षात ती नाही. पक्षात कुठल्याही टप्प्यावर अशी चर्चा सुरु नाहीय. आमचा पक्ष सोडून कोणीही जाणार नाही. उलट अन्य पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी रीघ लागेल असे बोम्मई म्हणाले. बाईट
आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत बोम्मई म्हणाले, याबाबत वरिष्ठांनी अद्याप सूचना दिलेली नाही. त्यांनी सूचना दिल्यावरच दिल्लीला जाणार आहे. वरिष्ठानी सांगितल्यावरच मंत्रिमंडळ पुनर्र्चना करण्यात येईल. याच महिनाअखेरीस 30, 31ला पक्ष राज्य कार्यकारिणीची सभा आहे. या सभेत राज्याच्या दौऱ्यासह अन्य विषयनावर चर्चा होणार आहे. बाईट
युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतेक सर्व भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. अडकलेल्या भारतीयांना आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नवीनचा मृतदेह आणण्याबाबत चर्चा सुरु आहे. रशियाचे हल्ले थांबल्यानंतर मृतदेह आणण्यासाठी पावले उचलण्यात येतील. युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्याना भारत सरकार विविध पद्धतीने मदत करत आहे असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. बाईट
एकंदर, मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा फेटाळून लावत अन्य पक्षांचे नेतेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा राजकीय बॉम्ब मुख्यमंत्री बोम्मई यांनी टाकला आहे.


Recent Comments