विजापूर येथील बबलादी मठाचे प्रमुख सिद्धू मूत्या होळीमठ महाराजांची भविष्यवाणी खरी ठरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजवर स्वामींनी केलेली भाकिते खरी ठरली असल्याने यंदाच्या भाकितामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या या भविष्यवाणीत यंदा नागरिकांच्या चिंतेत भर पाडणारी भाकिते करण्यात आली आहेत. पाहुयात यासंदर्भातील विस्तृत बातमी…
विजापूर बबलादी मठात गेल्यावर्षी झालेल्या भविष्यवाणीत मुख्यमंत्री बदल, रोगराई, युद्धपरिस्थिती यासंदर्भात भाकितं करण्यात आली होती. हि भाकितं खरी ठरली असून २०२२ सालच्या महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आलेल्या भाकितानंतर भाविकांच्या काळजीत मात्र वाढ झाली आहे. मठाचे पिठाधिकारी सिद्धू मुत्या होळीमठ यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी भविष्यवाणी केली असून या भविष्यवाणी युरोपीय देशांमध्ये आणखीन संघर्ष वाढून अमेरिका – रशिया – इराण यांच्यातील संघर्ष देखील वाढेल असे भाकीत त्यांनी केले आहे. यासह चढाओढीच्या स्पर्धांमुळे आणखीन कलह वाढण्याची भविष्यवाणीही पिठाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. २०२२ साली त्सुनामी, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याची भाकीत करण्यात आली होती. यानुसार २०२२ साली अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आपण पहिले आहे. 
याचप्रमाणे देशात अशांतता पसरेल, द्वेषाचे वातावरण निर्माण होईल, नागरिकांना त्रास, नुकसान सहन करावे लागेल, अशी भविष्यवाणीही पिठाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. पाप वाढत चालल्यामुळे या पापाचे परिणाम म्हणून युक्रेन रशिया यांच्यात युद्ध सुरु होऊन जीवितहानी होत असून हे सर्व पापांचे परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. यासह अनेक विषयांवरील भविष्यवाणीही सिद्धू मूत्या होळीमठ स्वामींनी वर्तविली आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी हि भविष्यवाणी वर्तविण्यात येते. कोरोना, महापूर, युद्धाची भीती, हवाई हल्ले, मुख्यमंत्री बदल, राजकीय घडामोडीत बदल यासह अनेक विषयांवर पिठाधिकाऱ्यांनी भविष्यवाणी केली असून ही भविष्यवाणी काहींना चिंतेत टाकणारी ठरली आहे तर काहींच्या आनंदाचे कारण बनले आहे.


Recent Comments