मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरात वाणिज्य आणि उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अर्थसंकल्प पूर्व बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

: होय, राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री बोम्मई यांनी विविध संघ-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा चालविली आहे. आज, शनिवारी त्यांनी कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी व्यापार व उद्योग जगताकडून असलेल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, राज्याचे मुख्य सचिव पी. रवीकुमार, अर्थ खात्याचे अपर मुख्य सचिव आयएनएस प्रसाद, उद्योग खात्याचे अपर मुख्य सचिव रमण रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, वाणिज्य कर खात्याच्या आयुक्त शिखा, वाणिज्य व उद्योग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments