Vijayapura

पंचमसाली आंदोलनात निराणी कुटुंबाची एन्ट्री? तिसऱ्या पिठाच्या निर्मितीसाठी आला वेग पंचमसाली समाज आंदोलनात देखील अधिकृत प्रवेश!

Share

राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांपैकी सध्या गाजत असलेला एक मुद्दा म्हणजे पंचमसाली समाजाच्या तिसऱ्या पिठाची निर्मिती. यासाठी निराणी कुटुंबियांना टार्गेट करून अनेक पलटवार करण्यात आले होते. मात्र आता याच निराणी कुटुंबाला अधिकृत एंट्री देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

होय…. निराणी कुटुंबाची अधिकृत एंट्री! इतके दिवस निराणी कुटुंबियांना टार्गेट करण्यात येत असताना अचानक तिसऱ्या पिठाच्या स्थापनेसंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. आणि या तिसऱ्या पिठाच्या निर्मितीसाठी निराणी कुटुंबाला अधिकृत दुजोरा देण्यात आल्याचेही समोर आहे आहे. शिवाय पंचमसाली समाजाच्या आंदोलनात देखील निराणी कुटुंबाला अधिकृत प्रवेश देण्यात आल्याचेही समजते आहे.

राज्यात पंचमसाली समाजाच्या तिसऱ्या पिठाच्या स्थापनेसंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. या पीठासंदर्भात विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सदर पीठ निराणी पीठ असल्याची टीकाही केली. परंतु या पिठाची आता अधिकृत स्थापना होत असून यासाठी मंत्री मुरुगेश निराणी आणि त्यांचे बंधू संगमेष निराणी यांनी पुढाकार घेतला आहे. आता आमदार यत्नाळांना अधिकृत निराणी पिठाच्या स्थापनेवरून टोला लगावण्यात येत आहे.

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर येथे रातोरात या पिठाच्या नियोजित पिठाधिकाऱ्यांशी म्हणजेच गुरूपादेश्वर श्रींची भेट घेऊन बैठक आयोजित करण्यात आली. याच संदर्भात पिठारोहण कार्यक्रमाचे पोस्टर देखील प्रकाशित करण्यात आले. सदर पिठाचा पिठारोहण कार्यक्रम येत्या १३ तारखेला आयोजित करण्यासंदर्भात हरिहर पंचमसली पिठाचे वचनानंद श्री यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जमखंडी येथे होणाऱ्या पिठारोहण कार्यक्रमात १ लाखाहून अधिक भक्त सामील होण्याची शक्यता असल्याचे संगमेष निराणी यांनी सांगितले आहे. शिवाय आमदार यत्नाळांनाही टोला लगावलाय.

या सभेत सहभागी झालेले वचनानंद श्री यांनीही आमदार यत्नाळांविरोधात पलटवार केला असून अशा हलक्या लोकांचे बोलणे आपण हल्यात घेऊन सोडून दिले पाहिजे, असा टोलाही लगावलाय. आरक्षणासंदर्भात देखील वचनानंद स्वामींनी प्रतिक्रिया दिली असून आपण कायद्याला अनुसरून राहणारे स्वामी असल्याचे सांगितले आहे.
आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोगाला ९०० पानांचा अहवाल दिला आहे. सर्व जिल्हे आणि तालुक्यातील समीक्षण केले आहे. राज्यपालांची भेट घेतली आहे. चर्चाही केली आहे. असे ते म्हणाले.

राज्यातील पंचमसाली समाजात सुरु असलेल्या आपसी मतभेदातून अखेर तिसऱ्या पिठाच्या स्थापनेला अधिकृत दुजोरा मिळाला असून येत्या १३ फेब्रुवारी रोजी अधिकृत रित्या पिठारोहण कार्यक्रम पार पडणार आहे.

Tags: