Belagavi

*बेळगावमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात *

Share

देशातील प्रसिद्ध पेट्रोलियम कंपनी असणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीचा ४६ वा वर्धापनदिन बेळगावमधील गोगटे पेट्रोल पंप येथे साजरा करण्यात आला.

शहरातील खानापूर मार्गावरील हिंदवाडी परिसरातील गोगटे सर्कल नजीक असणाऱ्या गोगटे पेट्रोल पंप येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पेट्रोलियमच्या संचालिका रोहिणी गोगटे, प्रमुख अतिथी सुधीर मंडल, साई रेड्डी, अविनाश पोतदार आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पेट्रोलपंपावरील नाविन्यपूर्ण अशा फ्लेक्स बोर्डचे अनिल पोतदार यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना श्रीमती रोहिणी गोगटे म्हणाल्या, बेळगावमधील आपल्या पेट्रोल पंपाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘प्युअर फॉर शुअर’ अंतर्गत ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक सुविधा अपग्रेड केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे नेक्सजन योजनेचाही अनावरण करण्यात आले असून ग्राहकांच्या सोयीसाठी पेट्रोल पंपवर आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येत आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक सुधीर मंडल बोलताना म्हणाले, भारत पेट्रोलियम साठी आज महत्वपूर्ण दिवस आहे. भारत पेट्रोलियम हि देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पेट्रोलियम कंपनी आहे. भारत पेट्रोलियमच्या वाटचालीला उजाळा देत सध्याच्या काळानुसार ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिथी साईविर रेड्डी यांनी पेट्रोल पंपवर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेत पंपवर मिळणाऱ्या गुणवत्तेसंदर्भात माहिती दिली. पेट्रोल, डिझेल याव्यतिरिक्त पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारखा पेट्रोल पंपवर उपलब्ध असलेल्या सुविधांमुळे ग्राहक देखील संतुष्ट असून ग्राहकांच्या अधिकाधिक सोयीसाठी यापुढील काळात अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

अविनाश पोतदार यांनी गोगटे पंप स्थापन करण्यासाठी गोगटे कुटुंबीयांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. गेली १५ वर्षे बेळगावमध्ये सेवा देणाऱ्या गोगटे पेट्रोल पम्पवर भारत पेट्रोलियम कंपनीचा ४६ वा वर्धापनदिन साजरा होत असून गोगटे पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या सर्व सोयींसाठी गोगटे कुटुंबियांचे मोठे परिश्रम असल्याचे सांगत पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोगटे कुटुंबियांच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अविनाश पोतदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोगटे पेट्रोम पम्पवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी प्युअर फॉर शुअर, नेक्स जनरेशन या उपक्रमांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच बीपीसीएल डीलर यांच्या हस्ते केक कापून शुभारंभ करण्यात आला.

बेळगावमध्ये १५ वर्षांपासून सेवा वाजविणाऱ्या गोगटे पेट्रोलपंवर भारत पेट्रोलियम कंपनीच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या सर्व सुविधांसंदर्भात माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

इन न्यूज, बेळगाव

Tags: