कोविड नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रंगभूमीवरील कलाकारांची अक्षरशः वानवा झाली आहे. कोविड परिस्थिती काहीशी नियंत्रणात येताच काही महिन्यांसाठी पुन्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता असतानाच ओमीक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली आणि यासाठी नाईट कर्फ्यू देखील घोषित झाला. सहसा रात्रीच्यावेळी नाटकाचे प्रयोग आयोजित केले जातात. परंतु नाईट कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा रंगभूमी कलाकारांसमोर आवासून संकटे उभी ठाकली आहेत… यासंदर्भातील इन न्यूज ने केलेला हा विशेष रिपोर्ट….

कोविडच्या नव्या ओमीक्रॉन या विषाणूने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली असून याचाच परिणाम म्हणून नाईट कर्फ्यूचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यासह विजापूर जिल्ह्यातील रंगभूमी कलाकार अडचणीत आले आहेत. टेन्ट मारून नाटक सादरीकरण करणाऱ्या विविध जिल्हयातील नाटक कंपन्यांना कोविडच्या तिसऱ्या लाटेची धास्ती लागली आहे. सहसा रात्रीच्यावेळी आवर्जून नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक असते. मात्र नाईट कर्फ्यूमुळे दिवसातील दोन खेळ सादर करण्यात येत आहेत. जत्रा, यात्रा, सण-समारंभ यावर पुन्हा निर्बंध आल्याने कलाकारांच्या जीवनावर संकटाचे सावट पसरले आहे.
यासंदर्भात जाणून घेऊयात रंगभूमिकालाकारांच्या प्रतिक्रिया…
सामान्यतः एका नाटक कंपनीत २५ ते ३० कलाकार काम करतात. महिला कलाकारांना एक हजार तर पुरुष कलाकारांना आठशेहे रुपयांचे मानधन दिले जाते. यासह नाटक कंपन्यांना जागेचे भाडे, इलेक्ट्रिसिटी बिल यासह अनेक खर्चांचाही ताळमेळ ठेवावा लागती. दररोज १५ ते १६ हजार रुपये खर्चून नाटकांचे खेळ प्रदर्शित होतात. सध्या प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून अनेक नाटक कंपन्या तोट्यात येत आहेत. अशातच नाईट कर्फ्यूचा आदेश जारी करण्यात आल्याने आधीच उलास अन त्यात फाल्गुन मास अशी वेळ नाटक कंपन्या आणि कलाकारांवर आली आहे.
विरेश्वर नाट्य संघ दररोज १४ ते १६ हजार रुपये खर्चून नाटक सादर करत आहे. परंतु या सादरीकरणात नाटक कंपनीला फायदा होत नसून खर्चात कपात करण्यासाठी तसेच जीवनाचा गाडा पुढे नेण्यासाठी कलाकारांना आपल्या मुलांसह टेन्टमध्येच राहायची परिस्थिती ओढवली आहे. अशा कलाकारांच्या समस्यांवर शासनाने तोडगा काढण्याची नितांत गरज आहे.


Recent Comments