चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील बेनाळ आरएस गावात घडली आहे.

बेनाळ आरएस गावातील ४५ वर्षीय शिवप्पा मनगुळी याला ३८ वर्षीय पत्नी हनुमव्वा हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच त्याने हनुमव्वाला गावाबाहेरील शेतात बोलावून नेऊन तेथील शेडमध्ये तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर शिवप्पाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी निडगुंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments