Kagawad

आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कागवाड येथील शाळा खोल्यांचे उदघाटन

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ परिसरातील पंचायतीच्या शेडबाळ स्टेशन आणि कल्लाळ गावात नाबार्ड योजनेंतर्गत ७२ लाख रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या सहा शाळा खोल्यांचे उद्घाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते पार पडले.

मंगळवारी शेडबाळ येथील सरकारी कन्नड शाळेच्या आवरणात २४ लाख रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्या, शेडबाळ स्टेशन येथील २ आणि कल्लाळ येथील २ अशा १२ लाख रुपयांच्या खर्चात एकूण सहा वर्ग खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे उदघाटन आमदार श्रीमंत पाटील यांनी केले.

उदघाटनानंर बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, कागवाड मतदार संघामध्ये निवडून आल्यानंतर अधिकाधिक शिक्षण, उत्तम रस्ते निर्मिती, शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. मतदार संघात २५ कोटी रुपयांच्या खर्चातून सुसज्ज अशा १८० शाळा इमारती बांधण्यात आल्या आहेत. आता शिक्षण विभागाच्यावतीने प्रत्येक शाळेत उत्तम शिक्षण मिळवून देण्याचीही जबाबदारी माझी असून या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नक्कीच प्रगती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेडबाळ स्टेशन येथे झालेल्या उद्घाटन समारंभात नगरपंचायत उपाध्यक्षा सुरेखा कवटगे, काशीबाई चोळके, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप साळुंखे, बसाप्पा चोळके, भरतेश पाटील, शाळेचे शिक्षक तसेच शेडबाळ येथे झालेल्या कार्यक्रमात नगरपंचायत अध्यक्ष रवी कांबळे, सुभाष ढाले, भरतेश पाटील, बीईओ मल्लप्पा मुंजे, अभियंता आर. पी. अवताडे, महांतेश कवलापूर, एम. ए. गणे, उत्कर्ष पाटील, एम. बी. पाटील, शिक्षक, ग्रामस्थ आणि नगरपंचायत सदस्य उपस्थित होते.

Tags: