Kagawad

शिरगुप्पी साखर कारखान्याकडून एकरकमी २७०० रु. बिल जमा

Share

 कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पुरविलेल्या उसाचे एकरकमी २७०० रु. बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष माजी . कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांनी दिली.

होय, या वर्षीच्या गाळप हंगामासाठी साखर कारखाने सज्ज होत असतानाच शिरगुप्पी साखर कारखान्याने एक मोठी घोषणा केली आहे. यंदा गाळप हंगामासाठी कारखान्याला ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २७६० रुपये दर देण्याचे कारखान्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांनी ‘आपली मराठी’ला ही माहिती देऊन सांगितले की, गेल्यावर्षी ऊस पुरविलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी २७०० रु प्रतिटन ऊसबिल जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रतिटन २७६० रुपये दर देण्यात येणार आहे.

यंदाचा गळीत हंगाम सुरु झाल्यावर १५ दिवसांच्या आत प्रतिटन २७६० रुपये बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यंदा कारखान्यातर्फे ७ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी उत्तम उतारा देणाऱ्या दर्जेदार उसाचा पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहनही अध्यक्ष माजी आ. कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांनी केले.

यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण फरांदे, व्ही. डी. यळगूड, कौतुक मगेन्नावर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: