उत्तराखंडमध्ये सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे मूळच्या विजापूरच्या सैन्यात सेवा बजावत असलेल्या महिला डॉक्टर अडकून पडल्याचे वृत्त आहे.

उत्तराखंडमध्ये सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ढगफुटी आणि भूस्खलनामुळे संकटात आणखी वाढ झाली आहे. या परिस्थितीत सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा बजावणारी विजापूर जिल्ह्यातील महिला अडकून पडल्याचे वृत्त आहे.
विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील अनिता पापन्नावर सैन्यात डॉक्टर आहेत. उत्तराखंडमधील नहालदवनी गावात त्या पुरस्थितीमुळे अडकून पडल्याचे समजते. मात्र कॅप्टन अनिता या सुरक्षित असून चिंतेचे कारण नाही अशी माहिती विजापूर जिल्हा प्रशासनाने एसडीआरएफच्या अहवालावरून दिली आहे. मात्र अनिता यांच्या कुटुंबियात चिंतेचे वातावरण असून मुलगी सुखरूप घरी परत येऊ दे अशी प्रार्थना कुटुंबीय करत आहेत.


Recent Comments