भरधाव कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील तिघेजण जखमी झाले, त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात विजापूर जिल्ह्यातील कोल्हार येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. २१८वर कृष्णा नदी पुलावर झाला.

बागलकोटहून विजापूरकडे येणारी मोटरसायकल पुलाजवळ रस्ता ओलांडताना पाहिमागून आलेल्या भरधाव कारची तिला धडक बसली. त्यामुळे मोटरसायकलवर मागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोटारसायकलचालक आणि एक बालक जखमी झाला आहे. तिघांनाही उपचारांसाठी बागलकोट जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मोटारसायकलचालक गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करतो. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. अपघातास कारण ठरलेली कार हुबळीतील असल्याचे समजते. कोल्हार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.



Recent Comments