मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी केल्यापासून येडियुरप्पा हे भाजप नेत्यांना विरोधी पक्षासारखे वाटू लागले आहेत अशी उपहासात्मक टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगावात मंगळवारी पत्रकारांसोबत बोलताना आ. सतीश जारकीहोळी यांनी येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यांवर प्रतिक्रिया देताना ही टीका केली. येडियुरप्पा यांना पायउतार केल्यापासून भाजपला ते विरोधी पक्षातले वाटू लागले आहेत. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांच्यावर ही स्थिती ओढवली आहे. काळच यावर उत्तर देईल असे त्यांनी सांगितले.
बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी बोलावलेल्या बुडाच्या बैठकीला भाजप आ. अभय पाटील आणि आ. अनिल बेनके अनुपस्थित राहिल्याबाबतच्या प्रश्नावर आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, आमच्या काळात आम्ही मंजूर केलेली कामे अजून प्रलंबित आहेत. बेळगाव शहरात एक वर्षांपासून विकास कुंठित झालेला आहे. अनुदान, प्रोत्साहन धन, सहाय्य धनाला कात्री लागली आहे. बुडा अध्यक्षांना हे दोन्ही आमदार सहकार्य करेना झाले आहेत. यावर त्या दोघांनीच तोडगा काढला पाहिजे असे त्यांनी सांगितले. बाईट बेळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीसंदर्भात प्रतिक्रिया देताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, महापौर निवडीसाठी १ वर्ष लागेल. बेळगावची ती परंपराच आहे. काही करता येत नाही. ज्याला सत्ता मिळायची त्याला ती मिळत नाही. बेळगाव पालिकेत पूर्वी मोजक्या लोकांनीच कारभार हाकला आहे असे त्यांनी सांगितले.
पुढील निवडणुकीत सत्ता मिळावी यासाठी उत्तर आणि दक्षिणमध्ये आतापासूनच तयारीला लागलो आहे. दोन्हीकडे पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे असे आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
एकूण काय तर बेळगावचे राजकारण म्हणजे राख धरलेला निखारा आहे. वाऱ्याच्या झोताने राख उडून गेल्यावर तो पुन्हा धगधगणारच. त्यामुळे येथे कधी अन काय होईल हे सांगता येत नाही हे मात्र खरे. पॉलिटिकल ब्युरो, आपली मराठी, बेळगाव.


Recent Comments