Belagavi

भाजप ग्रामीण मंडळकडून कुकडोळी गाव दत्तक; सेवाकार्यही सुरु

Share

भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी हे गाव विकासाच्या संदर्भात दत्तक घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गावात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कुकडोळी येथे आज, रविवारी युवकांनी स्वयंरोजगार सुरु करावा यासाठी मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला. तसेच व्यापारी तत्त्वावर वाढदिवसाचे केक कसे तयार करावेत या संदर्भात एक प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी घेण्यात आला. तसेच भाजप कुकडोळी शाखा पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यासंदर्भात बोलताना ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कुकडोळी गाव दत्तक घेण्यामागचा उद्देश भाजपला फक्त सभा निवडणुका आणि इतर कार्यक्रम एवढंच नाही तर गावामध्ये सेवा कार्य करून परिवर्तन घडविणे हा आहे. यासाठी कार्याला सुरुवात करण्यात आली असून, गावातूनही भरघोस पाठिंबा मिळत आहे. या प्रसंगी भाजप ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, सरचिटणीस बसवराज धमनी व मोठ्या प्रमाणात महिलावर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पंचमंडळी आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Tags: