
खेळायला गेलेल्या बहीण–भावाचा पाय घसरल्याने कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अथणी तालुक्यातील कोहळ्ळी गावात घडली.

होय, ऐन नवरात्रौत्सवात २ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी कोहळ्ळी गावात घडली. गावातील हायस्कुलजवळील कालवा भरून वाहत आहे. त्याठिकाणी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास श्रीधर शंकर पुंडीपल्ले, वय ३ वर्षे, विजय विनायक पुंडीपल्ले, वय ७, विश्वनाथ विनायक पुंडीपल्ले, वय ८ आणि सुषमा विनायक पुंडीपल्ले, वय ११ वर्षे ही बालके खेळण्यासाठी गेली असता कालव्यात बुडाली. त्यावेळी श्रीधर आणि विश्वनाथ याना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र विजय आणि सुषमा हे दोघे पाण्यात बुडून मरण पावले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने श्रीधर आणि विश्वनाथ याना कालव्यातून बाहेर काढेपर्यंत या दोघांचा पाण्यात गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. २ कोवळ्या मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली. या घटनेने कोहळ्ळी गावावर शोककळा पसरली आहे. ऎगळी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.



Recent Comments