Belagavi

पंचमसाली प्रतिज्ञा अभियानांतर्गत बेळगावात रॅली

Share

लिंगायत पंचमसाली समुदायाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरु झालेल्या पंचमसाली प्रतिज्ञा अभियानाचे शुक्रवारी बेळगावात आगमन झाले. यानिमित्त शहरात भव्य रॅली काढण्यात आली.

होय, पंचमसाली समुदायाला २-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या पंचमसाली प्रतिज्ञा अभियान या आंदोलनाला पुन्हा व्यापक स्वरूप आले आहे. बेळगावात शुक्रवारी सकाळी राणी चन्नम्मा चौकात या अभियानाच्या  रॅलीला कुडलसंगम पीठाचे जयमृत्युन्जय स्वामीजींनी चालना दिली. यावेळी फिरत्या वाहनातून स्वामीजींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंचमसाली समुदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद काशप्पण्णावर, पंचमसाली नेते रोहिणी पाटील, आर. के. पाटील, रुद्रण्णा चंदरगी, निंगाप्पा पिरोजी, दरेप्पा ठक्कन्नावर, राजू मगदूम, सुरेशगौडा पाटील आदी उपस्थित होते. सवाद्य मिरवणुकीने हजारो लोक पंचमसालींचा मेळावास्थळी गांधी भवनात पोहोचले.

 

 

Tags: