गांजा विक्री करणाऱ्या दोघांच्या निपाणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

होय, निपाणीतील चौथ्या गल्लीतील रहिवासी २६ वर्षीय हनीफ शेख आणि बादल प्लॉट येथील रहिवासी २६ वर्षीय सोहेल देसाई हे दोघे निपाणी शहराबाहेरील यरनाळ मार्गावर गांजा विक्री करत होते. त्याची पक्की खबर मिळताच सीपीआय संगमेष शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कृष्णवेणी गुर्लहोसूर, शिपाई शेखर असोदे, सुदर्शन अस्की, उदय कांबळे, पोपट ऐनापुरे, एस. एस. चिक्कोडी, बसवराज नावी यांच्या पथकाने त्यांना पकडले. या दोघांकडून १ किलो २५० ग्राम गांजा आणि रोख २,५०० रु जप्त केले. या दोघांना न्यालयासमोर हजर करण्यात आले.


Recent Comments