कॅन्सरपीडित ९ वर्षांच्या बालकाच्या उपचारांसाठी ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावातील अशोक दंडगलकर यांचा ९ वर्षांचा मुलगा आदित्य हा कॅन्सरशी झुंज देत आहे. त्याच्यावर कॅन्सर इस्पितळात उपचार करण्यात आले. मात्र उपचारांचा खर्च ९ लाख रु. झाला आहे. एवढे पैसे खर्च करण्याची दंडगलकर कुटुंबीयांची परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन बिल कमी करण्याची व मदतीची विनंती केली होती. त्यानंतर आ. हेब्बाळकर यांनी पाठपुरावा करून आदित्यच्या उपचारांसाठी ४ लाख रु मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करवून घेतले आहेत. याबाबतच्या आदेशाची प्रत आ. हेब्बाळकर यांनी आदित्यच्या पालकांकडे सुपूर्द केली. 
आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आदित्यच्या उपचारांसाठी वेळेत मदत मिळून त्याला नवजीवन मिळाल्यासारखे झाले आहे. त्यामुळे दंडगलकर कुटुंबीयांनी आ. हेब्बाळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.


Recent Comments