बेळगावातील सर्वात मोठी वस्ती असलेल्या रामतीर्थ नगरच्या समस्यांची मला जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी मी परिश्रम घेईन. सर्वानी मिळून एकसंघपणे या परिसराचा विकास करू असे नूतन नगरसेवक हणमंत कोंगाली यांनी सांगितले.

रामतीर्थ नगरातील स्नेह समाजसेवा संघातर्फे शुक्रवारी सायंकाळी नूतन नगरसेवक हणमंत कोंगाली यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार स्वीकारून बोलताना ते म्हणाले, या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. या परिसराचा विकास करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. येथील पाणी, वीजपुरवठा, रस्ते, गटारी, ड्रेनेज, भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त आदी नागरी समस्या सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष सुरेश उरबिनहट्टी यांनी स्थानिक समस्या मांडल्या.
यावेळी संघाचे सदस्य ऍड. महेश माविनकट्टी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे सचिव एस. सी. कामत, डी. एम. डोंनी, एस. बी. कल्याणी, राजेंद्र रतन, महेश चिटगी, महेश बागेवाडी, नजीर अहमद दलवाई, सी. एस. खणगांनी, दूंडाप्पा उळ्ळागड्डी, कल्लाप्पा मजलट्टी, नारायण हन्नीकेरी, बडिगेर आदी उपस्थित होते.


Recent Comments