Belagavi

२ सराईत सोनसाखळ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या !

Share

 बेळगावात सोनसाखळ्या चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे

माळमारुतीचे सीपीआय सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने दोघं सराईत सोनसाखळी चोरट्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रु किमतीच्या सोन्याच्या चेन, दीड लाख रु किमतीचे ६ मोबाईल संच आणि चेनचोरीसाठी वापरण्यात येणारी ६० हजार रु किमतीची होंडा ऍक्टिवा पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत पीएसआय होन्नाप्पा तळवार, एएसआय ए. बी. कुंडेद, एम. जे. कुरेर, के. डी. नदाफ, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लप्पणावर, सी. आय. चिगरी, मुत्तप्पा बोम्मनाळ, एस. एम. गुडेददगोळ, एल. एम. मुशापुरे यांनी भाग घेतला. या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून तपास पथकाला इनाम जाहीर केले आहे.

 

Tags: