शाळा–कॉलेजच्या विध्यार्थ्यांना समर्पक बससुविधा देण्यासह विविध मागण्यांसाठी अभाविपतर्फे बेळगावात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे विध्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विध्यार्थ्यांना शहर व ग्रामीण भागात समर्पक बससुविधा पुरवावी, स्कॉलरशिप द्यावी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यासंदर्भात बोलताना अभाविपचे जिल्हा संघटन सचिव सुरेश बेंगोडी म्हणाले, समर्पक बससेवा आणि हॉस्टेल सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. या सर्व सुविधा सरकारने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली,यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निदर्शनात अभाविपच्या जिल्हा शाखेच्या सदस्यांनी भाग घेतला.


Recent Comments