Belagavi

माजी सैनिकाचे घर फोडून सुमारे ३ लाखांचा ऐवज लांबविला

Share

माजी सैनिकाचे घर फोडून चोरटयांनी रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना बेळगावातील मारुतीनगरात घडली.

बेळगावातील एस. सी. मोटर्सजवळील मारुतीनगरात माजी सैनिकाचे घर लुटण्यात आली. माजी सैनिक अशोक कांबळे हे गणेशोत्सवानिमित्त संकेश्वरजवळील सोलापूर या आपल्या मूळ गावी कुटुंबियांसमवेत गेले होते. त्यामुळे घरात कोणी नव्हते. हे हेरून चोरटयांनी बंद घराचे कुलूप फोडून चोरी केली. चोरटयांनी घरात ठेवलेली २ लाख २० हजार रुपये रोख रक्कम आणि ३० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले. शेजाऱ्यांनी घर सताड उघडे असल्याचे पाहून अशोक कांबळे याना कळविले. तयानी आल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी माळमारुती पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदवली.

 

 

Tags: