भारतीय रेडक्रॉस संस्था, जिल्हा अपंग पूनर्वसन केंद्र, जिल्हा अंध सेवा संस्था आणि मुंबईच्या आलियावर जंग संस्थेच्या संयुक्त विध्यमाने अंध, मूक आणि बहिऱ्या व्यक्तींची मोफत तपासणी आणि उपकरणे वाटपाच्या ३ दिवसीय शिबिराला बेळगावात सोमवारी प्रारंभ झाला.

: बेळगावातील कोल्हापूर सर्कलजवळील माहेश्वरी अंधशाळेत सोमवारी आयोजित समारंभात जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अंध, मूक आणि बहिऱ्या व्यक्तींची मोफत तपासणी आणि उपकरणे वाटपाचे काम पुण्याईचे आहे.
भारतीय रेडक्रॉस संस्था अनेक दिवसांपासून या कामात गुंतली आहे. ते पुढेही सुरु रहावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. याप्रसंगी बेळगाव जि. पं. चे सीईओ दर्शन एच. व्ही., भारतीय रेडक्रॉस संस्थेचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष अशोक बदामी, बसवराज वरवट्टी, डॉ. आर. पी. शर्मा, नामदेव बेलकर, डॉ. व्ही. डी. डांगे, डॉ. डी. एन. मिसाळे आदी उपस्थित होते.



Recent Comments