कर्नाटक आपली एक इंचही जमीन आणि एक थेंबही पाणी कोणाला देणार नाही. सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम आहे. २००६मध्येच हा अहवाल विधिमंडळात सर्वानुमते मंजूर करून स्वीकारलेला आहे असे जलसंसाधन व बेळगावचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.

होय, शनिवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, आम्ही लोकशाही देशात राहतो. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी अहजन अहवालच अंतिम आहे. विधिमंडळ सोडून अन्य कोणत्याही संघ-संस्थेने केलेल्या ठराविक कवडीचीही किंमत नाही. आमच्या भूमिकेत बदल होणार नाही. शांती बिघडविण्याचे काहींचे कामच असते. ते त्याच्यासाठीच असतात. त्यांना किंमत देण्याची गरज नाही असे कारजोळ म्हणाले.
मी जलसंसाधन मंत्री होऊन १ महिना झाला आहे. या अवधीत दोन्ही मुख्यमंत्र्यांसमवेत २ वेळा दिल्लीला जाऊन केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी राज्यातील पाणी योजनांसंदर्भात चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे आंतरराज्य पाणीतंट्यात आमच्या बाजूने निकाल यावा यासाठी जोरदार युक्तिवाद करण्याची कडक ताकीद मुख्यमंत्र्यांनी कायदेतज्ज्ञांना केली आहे. सीडब्ल्यूसीच्या अधिकाऱ्यांशीही बैठक घेऊन चर्चा केली आहे. एत्तीनहोळे योजनेतून राज्याला २४ टीएमसी पाणी मिळणार आहे. योजनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. आमच्या वाट्याच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी निश्चितच सर्व प्रयत्न करू असे मंत्री कारजोळ म्हणाले.
काही राज्यस्तरीय कार्यालये बेळगावात स्थलांतरित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार चालविला आहे. बेळगावला ऐतिहासिक नगर म्हणून शाबीत करायचा त्यांचा विचार आहे. येथे कोणकोणती विकासकामे करायची हे आमदार, खासदार ठरवतील. ती राबविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. बेळगावातील प्रस्तावित बायपास रोडसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. लवकरच या कामाला प्रारंभ करण्यात येईल असे कारजोळ म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यातील काही आमदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बहुतेक तिन्ही महापालिकात भाजप सत्तेवर येणार आहे. कलबुर्गी महापालिकेतही भाजपचं सत्तेवर येणार हे सत्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळगाव मनपा निवडणुकीत सविता कांबळे या सफाई कामगार महिलेला उमेदवारी देऊन निवडून आणून भाजपने सामाजिक न्याय जपल्याचे मंत्री कारजोळ म्हणाले.
पत्रकार परिषदेला खा. मंगल अंगडी, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, भाजप महानगराध्यक्ष शशिकांत पाटील, राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.


Recent Comments