Belagavi

भरधाव कारची दुचाकीला धडक : वकील गंभीर जखमी 

Share

 दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने वकील गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी एसपी ऑफिसजवळ झाला

बेळगावातील एसपी ऑफिस रोडवर गुरुवारी सकाळी एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार वकील आर. टी. पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणारी कार अचानक उजव्या बाजूने आल्याने तिची दुचाकीला धडक बसली अन हा अपघात झाला. यात कार चालकाची चूक असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली.

वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे कारचालकाचे म्हणणे आहे. पोलीस तपासताच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 

Tags: