Belagavi

बेळगाव मनपाची फेरनिवडणूक घ्या : म. ए. समितीची मागणी

Share

 बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा संशय असल्याने फेरमतदान घेण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे

कालच बेळगाव मनपा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. अनपेक्षितरित्या म. ए. समितीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून सरकारने या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप म. ए. समितीने केला आहे. त्यामुळे फेरमतदान घेण्याची मागणी म. ए. समितीने केली आहे. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना हे निवेदन दिले. निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट वापरण्यात आले नाही.आमच्या मतदारांनी योग्य मतदान केले असले तरी मते योग्य पद्धतीने पडली नाहीत. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट नसेल तर दिलेले मत पडले कि नाही हे कसे कळणार? त्यामुळे सरकारने याबाबत सत्तेचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होते. त्याशिवाय निवडणुकीत गैरप्रकार केल्याचाही संशय आहे. त्यामुळे ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडून फेरमतदान घ्यावे अशी मागणी समिती नेत्यांनी केली.

 

Tags: