Belagavi

केंद्रीय अभ्यास पथकाचे बेळगावात आगमन

Share

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अभ्यास पथकाचे रविवारी बेळगाव जिल्ह्यात आगमन झाले.

पुरामुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीच्या पाहणी व अभ्यासासाठी केंद्रीय पथकाचे रविवारी बेळगावात आगमन झाले. वरिष्ठ अधिकारी सुशील पाल यांच्या नेतृत्वखालील सदस्यांचे हे पथक आज व उद्या नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. केंद्रीय पथक जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहे. आज जिल्ह्यातील खानापूर, बेळगाव, हुक्केरी व गोकाक या तालुक्यांना भेट देऊन पाहणी करण्याचे केंद्रीय पथकाचे नियोजन आहे.

तर उद्या अथणी, कागवाड, चिक्कोडी व निपाणी या तालुक्यांना हे पथक भेट देणार आहे. मलप्रभा, घटप्रभा, हिरण्यकेशी, कृष्णा आदी सप्तनद्यांमुळे परिसरातील शेती, शाळा आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी व अभ्यास हे पथक करणार आहे.

Tags: