Belagavi

‘दिल्ली बदला है, बेलगाम भी बदलेगा !’ आपही आता मनपा निवडणूक रिंगणात !

Share

दिल्ली बदला है, बेलगाम भी बदलेगा! असे घोषवाक्य घेऊन आता आम आदमी पार्टीही बेळगाव मनपा निवडणुकीच्या  रिंगणात उतरली आहे. होय, भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पार्टीसुद्धा बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणूक रिंगणात शड्डू ठोकून उतरली आहे. इतकेच नाही तर पक्षाने आपल्या काही उमेदवारांची घोषणाही करून टाकली आहे. आपचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्ष निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ प्रभागात आप आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यसभा सदस्य संजयसिंग, रोमी भाटी व अन्य नेते येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुहेगारी पार्श्वभूमी असल्यानं उमेदवारी देण्यात येणार नाही. तसेच जर अशी पार्श्वभूमी असल्याचे समजून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ती. बी. नागन्ना म्हणाले, आमच्या नेत्यांना काँग्रेस नेत्यांनी बोलावले होते. पुन्हा बोलावल्यास ठीक होणार नाही असा इशारा दिला.

 

Tags: