प्राथमिक शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे हे प्राथमिक शिक्षण कृतीयुक्त व आकर्षक असावे असा विद्यार्थ्यांचा मानस असतो मात्र खेडोपाडी विविध समस्यांनी ग्रासलेल्या सरकारी शाळांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे .

शाळांची गरज ओळखुन ग्रीन बोर्ड सरकारी शाळांना देण्याचे कार्य भाजपा बेळगाव मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पेलले आहे. आज पर्यंत मराठी शाळा निलजी येथे 07, मराठी शाळा बेनकनहळ्ळी येथे 04, कन्नड शाळा कुकडोळी येथे 07 ग्रीन बोर्डाचे वाटप करण्यात आले आहे.
अजुनही ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये विकासापासुन वंचित असलेल्या 60 शाळांना ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प या कार्यकर्त्यांनी केला आहे. देशपातळीवर चाललेली विकासाची गंगा तालुक्यामध्येही व्हावी यासाठी भाजपा वचनबद्ध असल्याचे श्री. धनंजय जाधव यांनी सांगितले. दिनविशेष पटसंख्या आकार 04×10 चे उत्तम दर्जाचे बोर्ड वितरित केले जात आहेत.

बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सर्व सरकारी शाळांची पाहणी करुन सध्या 60 मराठी व कन्नड शाळांना प्रत्येक शाळेला 07 ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळने केला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीव्दारे देणगीदाराकडून सहाय्य घेऊन कार्य चालू केले आहे. या कार्यासाठी विधानपरिषद सदस्य साबन्ना तळवार यांनी 81 बोर्ड आपल्या अनुदानातुन तर 155 बोर्ड विधानपरिषद सदस्य अरुण शहापुरे यांच्या अनुदानातुन तर 50 बोर्ड भाजपा मंडळ संघटनेकडुन देण्यात येत आहेत. एकूण 400 बोर्ड देण्याचे लक्ष्य समोर ठेवुन कार्य चालु आहे.


Recent Comments