आ .लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे , बेळगाव तालुका पूरग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे . राज्य सरकारने , पूरग्रस्त तालुक्यांच्या यादीत २२ नवीन तालुके समाविष्ट झाले आहेत . यामध्ये बेळगाव तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला आहे .याआधी पूरग्रस्त भागांच्या यादीती ६१ तालुक्याचा समावेश करुन , सरकारने आदेश दिला होता . मात्र त्यामध्ये बेळगाव तालुक्याचा समावेश नसल्याने, आ . लक्ष्मी हेब्बाळकर या संतप्त झाल्या होत्या . बेळगाव तालुक्याचा समावेश पुरग्रस्तांच्या यादीत करा अन्यथा तुमच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करु असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता . त्याचप्रमाणे , बेंगळूर जाऊन, वरिष्ठ अधिकाऱ्यांना , सविस्तर माहिती देऊन , पूरग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगावचा समावेश करण्याची विनंती केली .

विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी , बेळगाव तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे . इथली परिस्थिती पाहून गेले आहेत . त्यामुळे बेळगाव तालुक्याचा देखील पूरग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करा अशी भूमिका आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मांडली .

यासह जिल्हा अधिकाऱ्यांना सर्व माहित मिळाली आणि त्यांनी राज्य सरकारकडे नवा प्रस्ताव पाठवला . त्यामुळे पूरग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगावची देखील भर पडली आहे .राज्य सरकारने बेळगावसह २२ तालुक्यांना पूरप्रवण म्हणून घोषित केले आहे . महसूल मंत्री आर अशोक यांनी याबद्दलची माहिती दिली .


Recent Comments