” बेळगावमधील , ऑटोनगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला . चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून उतरल्याने मोठा अनर्थ टळला . मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली .
रविवारी , रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ऑटोनगरातून चालले होते . आरटीओ ग्राउंडजवळ त्यांना , आपल्या कारमधून धूर येताना दिसला . त्यामुळे त्यांनी आपली कार थांबवून खाली उतरले . अगदी पाचच मिनिटात संपूर्ण कारने पेट घेतला .घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली मात्र तोपर्यंत संपुर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली होती .माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .
Recent Comments