बेळगावात दाखल झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सीमावाद आणि मराठी भाषेशी संबंधित विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

बेळगावात दाखल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (फ्लो)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, तसेच कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली. याशिवाय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाप्रश्न आणि मराठी भाषेबाबत केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आल्याची माहिती वकील अमर येळ्ळूरकर यांनी दिली. बाईट
शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापूर येथे उच्चाधिकार मंत्रिमंडळ समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली. समन्वय मंत्रालय बेळगावला पाठवण्याची मागणी तसेच बैठकीत शरद पवार यांच्याशीही चर्चा करून प्रलंबित विषय मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्याबाबतच्या तक्रारीवर पुण्यातील समन्वयकांशी चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे किणेकर यांनी स्पष्ट केले. बाईट
गेल्या 8 जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय अद्याप अंमलात आलेले नाहीत, ही बाब निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आल्याचे म. ए. समितीचे नेते रणजित चव्हाण-पाटील यांनी सांगितले. अधिवेशनानंतर बैठक बोलावून सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट
दरम्यान, दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास आगामी काळात मंत्रालयासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही वकील अमर येळ्ळूरकर यांनी दिला. यावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments