बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासह काळी आमराई परिसरातील आंबेडकर भवनाला भेट देऊन पाहणी केली.


यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत इमारतीसंदर्भातील समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.


आंबेडकर भवनाची पाहणी केल्यानंतर इमारतीला रंगकाम करणे, छतावर पत्रे बसविणे, तसेच प्लंबिंग आणि ड्रेनेजची कामे करण्याचे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना दिले. या कामांमुळे भवनाची सुविधा अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. आमदारांच्या भेटीचे आणि कामांच्या आश्वासनाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.




Recent Comments