Belagavi

बेळगावच्या चिदंबरनगरमध्ये ४८ वा श्री चिदंबर जन्मोत्सव सोहळा

Share

बेळगावच्या चिदंबरनगर येथे श्री शिवचिदंबर महाराज यांचा ४८ वा जन्मोत्सव तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी उदकशांती, गणपती अथर्वशीर्ष, ध्वजारोहण, महा रुद्रहोम आदींसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. राजाराम मंदिरातून निघणारी पालखी सेवा चिदंबर मंदिरापर्यंत येणार असून, या मिरवणुकीत मुरगोड येथील भजन मंडळ सहभागी होणार आहे. जन्मोत्सवाच्या दिवशी कीर्तन, चिदंबर दिनसेवा, पाळणा सेवा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी संगीत सेवाही होणार आहे, या सोहळ्याबाबत मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे.

३० नोव्हेंबर रोजी रुद्रस्वाहाकार, महाप्रसाद आणि संगीत सेवा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. या काळात दुपारपासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी नारायण कुलकर्णी यांनी दिली.

बेळगाव शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन चिदंबर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags: