Belagavi

मंडोळी-खादरवाडी जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Share

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंडोळी आणि खादरवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

अडीच कोटी रुपये खर्चातून या रस्त्याचे कामकाज करण्यात येत असून युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

या रस्त्यामुळे मंडोळी आणि खादरवाडी या दोन्ही गावांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासामुळे नागरिकांच्या प्रवासासोबतच कृषी उत्पादनांची वाहतूकही सुलभ होऊन स्थानिक आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, असे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी दोन्ही गावांतील ज्येष्ठ नागरिक, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: