Belagavi

‘पेरिओकनेक्ट २०२६’ परिषदेत केएलई दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुरस्कारांवर मोहोर

Share

म्हैसूर येथे झालेल्या ‘यूजी आयएसपी पेरिओकनेक्ट २०२६’ परिषदेत बेळगावच्या केएलई व्ही. के. दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक सत्रांमध्ये वैयक्तिक पुरस्कार मिळवले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

म्हैसूर येथील जेएसएस दंत वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या परिषदेत प्राध्यापक डॉ. सागर जालीहाळ आणि डॉ. रूपाली संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली सृष्टी अण्णागौडा पाटील, सारदा भरत मनस्वी, कृतिका श्रीनिवासन आणि परिधी गुप्ता यांनी सहभाग घेतला. विविध वैज्ञानिक सत्रांतील सादरीकरणासाठी त्यांना वैयक्तिक पुरस्कार मिळाले.

विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांच्या कामगिरीचे प्राचार्य डॉ. कांतिश्वरी कुमटळ्ळी, उपप्राचार्य डॉ. अंजना बागेवाडी आणि अधिष्ठाता डॉ. विनायक कुंभोजकर यांनी अभिनंदन केले.

Tags: